Anandwadi Port : आनंदवाडी बंदर १८ महिन्यांत पूर्ण होणार!

मंत्री नितेश राणे; आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार पाहणी
Nitesh Rane
ना. नितेश राणे (Pudhari File Photo)
Published on
Updated on

देवगड : गेल्या १८ वर्षांपासून रखडलेले देवगड-आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाला प्रत्यक्ष गती मिळाली असून जेटी, कार्यशाळा व गाळ काढण्याची कामे सुरू झाली आहेत. मासळी लिलावगृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते आदी उर्वरीत कामे येत्या १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष बंदराची पाहणी करून कामांचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मत्स्योद्योग विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, जेटीचे बांधकाम, कार्यशाळा, जाळी विणण्याचे शेड आणि गाळ काढण्याची कामे मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत सुरू आहेत. उर्वरित कामांनाही आता गती देण्यात येणार आहे. मत्स्यबंदराच्या विकासांतर्गत मासळी लिलावगृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, उपहारगृह, मच्छीमारांसाठी विश्रांतीगृह तसेच रेडिओ वॉरन कम्युनिकेशन सेंटर आदी कामांचा समावेश आहे.

या उर्वरित कामांचा आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे २१ ऑगस्ट रोजी दुपारी आनंदवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. स्थळ पाहणीदरम्यान आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांबाबत सविस्तर आढावा व सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, मत्स्यबंदराच्या विकासांतर्गत उर्वरित सर्व कामे १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा महामंडळाचा मानस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news