

निर्णय राऊत
आंबोली : सह्याद्रीतील जैवविविधतेचा मुख्य ‘हॉट स्पॉट’ म्हणजेच निसर्गसुंदर आंबोली पर्यटनस्थळ होय! यासह महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक यांना एकत्रित जोडणारा विस्तीर्ण जंगलाचा अत्यंत महत्वाचा आंबोली परिसर आहे. जर राज्य सरकारने वेळीच पुढाकार घेतल्यास हेच पर्यटनस्थळ येत्या काळात 'निसर्ग व वन्यजीव पर्यटना'चा अद्भुत असा जागतिक दर्जाचा केंद्रच बनू शकतं. त्यामुळे राज्यातील ताडोबा सारख्या अभयरण्यांच्या धरतीवर, मात्र पूर्णतः नियंत्रित अशा अधिकृत 'जंगल सफारी व नाईट सफारी' ह्या आंबोली–दोडामार्ग वाईल्ड लाईफ कॉरिडॉर यामध्ये तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी ‘आंबोली टुरिझम’कडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. तर राज्यातील अंतिमहत्वाच्या ह्या ओपन फॉरेस्ट असणाऱ्या 'आंबोली व दोडामार्ग वाईल्ड कॉरिडॉर'मधे निसर्ग व वन्यजीव पर्यटन अंतर्गत 'जंगल सफारी व नाईट सफारी'ला अधिकृत सुरुवात झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्याच्या पर्यटनाला सर्वात मोठा ‘बूस्टर डोस’ मिळणार आहे, यात शंका नाही. म्हणूनच यासाठी राज्य सरकारने वेळीच पुढाकार घेणं हे अत्यंत आवश्यक आहे.
‘समुद्र’ व साहसी जल पर्यटना सोबतच 'निसर्ग व वन्यजीव पर्यटना'चा एकत्रित अविस्मरणीय आनंद घेण्याचा पर्याय देखील असंख्य पर्यटकांना उपलब्ध होईल. यासाठी राज्य सरकारने वेळीच पुढाकार घेणे आवश्यकच आहे. म्हणूनच ‘आंबोली–दोडामार्ग वाईल्ड कोरिडॉर’मधे ताडोबा अभयरण्याच्या धरतीवर, मात्र पूर्णतः नियंत्रित अश्या अधिकृत 'जंगल सफारी व नाईट सफारी' ह्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. आंबोली व दोडामार्ग वाईल्ड कॉरिडॉर मधे अधिकृत जंगल सफारी व नाईट सफारी'ला सुरुवात झाल्यास सिंधुदुर्ग व गोव्याच्या पर्यटनाला कायमची कल्पनेपेक्षा मोठी चालना मिळेल. ज्याने गोवा व सिंधुदुर्गाच्या पर्यटनात अनेक पटीने वाढ होईल. हे निश्चित आहे.
आंबोली वनपरीक्षेत्र हे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी परिसर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि गोवा-कर्नाटक राज्यातील अभयारण्ये यांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा वन्यजीव भ्रमणमार्ग देखील आहे. या जंगलात पट्टेरी वाघ व बिबटे असून त्यांची संख्याही कल्पने पेक्षा अधिक आहे. तसेच बिबटे (अगदी ब्लॅक पँथर सुद्धा), रानगवे, सांबर, भेकर, पिसोरी हरीण, अस्वल, रानडुक्कर, रानमांजरे, उदमांजर, शेकरू, रानकुत्रे, कोल्हे, ससे, लाजवंती आदी प्राण्यांसह शेकडो प्रजातींचे पक्षी व फुलपाखरे आदी अनेक दुर्मीळ व अतिदुर्मीळ प्रजाती ह्याही येथे आढळतात. याचा थेट फायदा वन्यजीव पर्यटनाला होऊ शकतो.
दरम्यान, आंबोली वनपरीक्षेत्रात आजवर वाघ व बिबटे यांचे मोठे अस्तित्व हे वारंवार अधोरेखित होत आहे. परिणामी असंख्य पर्यटकांत सद्या निसर्ग व वन्यजीव पर्यटन तथा जंगल व नाईट सफारीचे प्रचंड आकर्षण वाढले असून काहीवर्षा पूर्वी 'आंबोली टुरिझम'ने सुरू केलेल्या नाईट सफारीने आंबोलीच्या पर्यटनाला बारमाही 'बूस्टर डोज' दिलेला आहे. यात सुमारे ३५ टक्के पर्यटक हे 'नाईट सफारी' साठी विशेषतः आंबोलीत येत, रोमांचकारी नाईट सफारी'चा आनंद घेतात. याचदरम्यान वाघ, बिबटे, अस्वल सह विविध प्रजातींच्या अनेक प्राण्यांचे दर्शन होते. त्यामुळेच आंबोली-दोडामार्ग वाईल्ड लाईफ कॉरिडॉरमधे निसर्ग व वन्य जीव पर्यटन तथा जंगल सफारी व नाईट सफारी यांना अधिकृत सुरुवात झाली असता ते ओपन फॉरेस्ट असलेलं आंबोली व दोडामार्ग वनपरीक्षेत्र हे देशातील सर्वात आकर्षणाचे एकमेव ठिकाण हे बनू शकतं.
सोबतच बारमाही पर्यटन येथे सहज शक्य असून हजारो स्थानिक लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या अनेक संधी ह्याही सुद्धा उपलब्ध होतील. म्हणूनच वेळीच राज्य सरकारने आंबोली-दोडामार्ग वाईल्ड लाईफ कॉरिडॉरमधे अधिकृत निसर्ग व वन्यजीव पर्यटनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी 'आंबोली टुरिझम'कडून वारंवार करण्यात येत आहे.
जंगल सफारीचे काही कोअर आणि बफर सदृश्य झोन
आंबोली वनपरीक्षेत्र परिसरात १२ हून अधिक वाघांचा मुक्त वावर असण्याची शक्यता असून आंबोली वनक्षेत्रातील जंगल सफारीचे मुख्य कोअर आणि बफर सदृश्य काही झोन म्हणजेच आंबोलीसह चौकुळ, गेळे, केगद, कुंभवडे, खडपडे, फुकेरी, भेकुर्ली, इसापूर, पारगड, सडेगूडुळे (ता. चंदगड जि. कोल्हापूर), घाटकरवाडी, कितवडे (ता. आजरा, जि. कोल्हापूर), पारपोली, देवसू, शिरशिंगे, केसरी, फणसवडे, घारपी आणि इतर हे आहेत. सोबतच दोडामार्ग परिसरातही सुमारे २० हून अधिक जंगल सफारीचे विशेष कोअर आणि बफर झोन आहेत.