

Achra Rameshwar Sansthan Ramnavami 2026
उदय बापर्डेकर
आचरा : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक दिमाखात सुरुवात झाली. कानविंदे यांच्या वाड्यातून पट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मूर्ती मानकरी, देवसेवक, महालदार, तसेच निशाण, भगवे बावटे, ढोल-ताशा, मृदुंग यांच्या गजरात मिरवणुकीने रामेश्वर मंदिरात आणण्यात आली. ‘जय जय रघुवीर समर्थ’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रामनवमीच्या निमित्ताने रामेश्वर मंदिरासह परिसरातील मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहेत. गुरुवारी सकाळी मंदिरासमोर शाही गुढी उभारण्यात आली, तर दुपारी श्री रघुपतीच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर हेमंत वाखणकर जोशी व नीलेश सरजोशी यांनी पंचांग वाचन केले. आरतीनंतर भाविकांना कडूनिंब व साखर यांचा प्रसाद वितरित करण्यात आला.
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव हा हरीहरांच्या संगमाचे प्रतीक मानला जातो. भोळ्या सांब सदाशिवाने आपल्या आराध्य दैवताचा केलेला हा उत्सव पारंपरिक थाटात साजरा केला जातो. सायंकाळी ‘श्री’च्या पाषाणाला शाही स्नान घालण्यात आले, त्यानंतर सभा मंडपात पुराण वाचन झाले. यावेळी उपस्थित कलाकारांनी श्रींच्या दरबारात गायन सेवा सादर केली.
रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह श्री विष्णूची मूर्ती सुशोभित पालखीत विराजमान करून रामेश्वर मंदिराभोवती सोमसूत्री प्रदक्षिणा घालण्यात आली. यंदा ह.भ.प. रोहन पुराणिक बुवा (परुळे-वेंगुर्ला) कीर्तन सेवा देणार असून, त्यांना पेटीवर आनंद लिंगायत (बुरंबाड-संगमेश्वर) आणि तबल्यावर ऋग्वेद रेमणे (साखरपा) साथ करणार आहेत. हा धार्मिक सोहळा ललिता पंचमीपर्यंत दररोज पार पडणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने कराड, सांगली, सातारा, फलटण, कोल्हापूर, पुणे आदी भागांतून विविध बँडपथके सहभागी होणार असून, या उत्सवात रंगत आणणार आहेत.
शुक्रवार दि. २० मार्च २०२६
सकाळी १०.०० वा. गायक श्री. रंगनाथ गोविंद खोत (कातवण-देवगड)
सायं . ०६.०० वा. सतार वादन
सतार वादक श्री. सौरभ सचिन साळुंखे (मिरज-सांगली) तबला साथ- श्री. अनुराग धोंडीराम साळुंखे (मिरज-सांगली)
शनिवार दि. २1 मार्च २०२६
सकाळी १०.०० वा. हिमवेद प्रस्तुत गायन कार्यक्रम गायक- हिमांशू आणि वेद चव्हाण (जामसंडे)
सायं. ०६.०० वा. व्हायोलीन वादन
व्हायोलीन बादक-श्री.उदय गोखले (रत्नागिरी)
तबला साथ- श्री. प्रथमेश शहाणे.
रविवार दि. २२ मार्च २०२६
सकाळी सका.१०.०० वा. जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा (स्वरयात्रा)
सायं.०६.०० वा.गायिका कु. संपदा दुखंडे (आचरा)
सोमवार दि. २३ मार्च २०२६
सकाळी ११.०० वा. गायक कु. ऋग्वेद सरजोशी आणि कु. विनय वझे व सहकारी (आचरा)
सायं. ०६.०० वा.राम रंगी रंगले
सादरकर्ते संगीत विशारद सौ. श्रद्धा सिनकर
अल्फा झी सरगम चे विजेते गायक श्री. अवधूत रेगे.
मंगळवार दि. २४ मार्च २०२६
सकाळी १०.०० वा. गायन स्थानिक गायक कलाकार
सायं. ०६.०० वा. शंभो शंकरा
सादरकर्ते संगीत विशारद सौ. श्रद्धा सिनकर अल्फा झी सरगम चे विजेते गायक श्री. अवधूत रेगे.
बुधवार दि. २५ मार्च २०२६
सकाळी १०.०० वा.स्थानिक गायक कलाकार
सायं.०६.०० वा.गायक पं. श्री.गिरीश संझगिरी (मुंबई)
संवादिनी श्री. सिद्धेश ठक्कर
तबला साथ- पं. श्री. गिरीश नलावडे
गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रामनवमी
रामजन्माचे कीर्तन - श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) (सांगली) "श्रीराम जन्म"
सायंकाळी ०६.०० वा.
गायक- पं.श्री. गिरीश संझगिरी (मुंबई)
संवादिनी श्री. सिद्धेश ठक्कर
तबला साथ- पं.श्री. गिरीश नलावडे
शुक्रवार दि. २७ मार्च २०२६
सकाळी १०.०० वा. गायन स्थानिक गायक कलाकार.साय. ०६.०० वा. गायिका कु. निधी घारे (पुणे)संवादिनी श्री. सुशील गद्रे,
पखवाज- गणेश मेस्त्री,तबला वादक अभिनव जोशी,तालवाद्य- हर्ष बोंडाळे
शनिवार दि. २८ मार्च २०२६
सकाळी १०.०० वा. गायन
स्थानिक गायक कलाकार
साय.०६.०० वा. गायन स्थानिक गायक कलाकार
"श्री"च्या महापूजेनंतर स्थानिक भजने व रात्रौ लळीत.
बुधवार दि. ०१ एप्रिल २०२६
रात्री ०९.४५ वा.- कै.ग.दि.माडगुळकर रचित आणि कै. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणावर आधारित
मन हे राम रंगी रंगले
हनुमान जयंती उत्सव
पहाटे पालखी नंतर
हनुमान जन्माचे कीर्तन- श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) (सांगली)
"श्री हनुमान जन्म"
तरी या रामनवमी उत्सवात सहभागी होण्याचे आव्हान अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी, सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.