Sindhudurg Accident : कारच्या धडकेत पिंगुळीतील वृद्धा ठार

महामार्ग ओलांडताना टेंबधुरीनगर येथे अपघात; कारचालकावर गुन्हा
Sindhudurg Accident News
कारच्या धडकेत पिंगुळीतील वृद्धा ठारPudhari
Published on
Updated on

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-टेंबधुरीनगर येथे सावंतवाडीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारची जोराची धडक बसून पादचारी महिला आशा सोनू धुरी (63, रा. पिंगुळी- धुरीटेंबनगर) ही जागीच ठार झाली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी 9.45 वा.च्या सुमारास घडली. त्या महामार्ग ओलांडून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती आदेश पांडुरंग धुरी (रा. पिंगुळी- धुरीटेंबनगर) यांनी कुडाळ पोलिसात दिली.

श्रीमती धुरी या सोमवारी सकाळी 9.45 वा.च्या सुमारास महामार्ग ओलांडून पलीकडे जात होत्या. त्याचवेळेस सावंतवाडीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मारुती सुझुकी कारची श्रीमती धुरी यांना जोराची धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्या जागीच ठार झाल्या. धडकेनंतर कार साधारण 35 ते 40 मीटर अंतरावर जाऊन थांबली. अपघाताची माहिती मिळताच पिंगुळी- धुरीटेंबनगर व मोरजकरवाडी ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पोलिस व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.

याबाबतची खबर मयत महिलेचा पुतण्या आदेश पांडुरंग धुरी यांनी कुडाळ पोलिसात दिली. त्यानुसार महामार्गावरून भरधाव वेगाने, हयगयीने, बेदरकारपणे वाहन चालवून रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ठोकर देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालक अमर दशरथ धुरी (29, रा. कुंब्रल, दोडामार्ग, सध्या रा. मुंबई) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news