Sindhudurg Accident : उभ्या दुचाकीला कारची धडक; स्वार गंभीर

सटमटवाडी तपासणी नाक्यानजिकची घटना
Sindhudurg Accident News
Sindhudurg Accident News
Published on
Updated on

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील सटमटवाडी तपासणी नाक्यानजीक हेरंब हॉटेल परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी सुमारे 10.15 वा.च्या सुमारास घडला. आदेश पेडणेकर (वय 28, रा. बांदा) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चैतन्य पेडणेकर यांनी फिर्याद दिली आहे.

आदेश पेडणेकर हे बांदा येथून गोव्याच्या दिशेने दुचाकीने जात होते. हेरंब हॉटेल परिसरात कॉल आल्याने ते दुचाकी रस्त्याच्या साईडपट्टीवर उभी करून फोनवर बोलत होते. दरम्यान मागून गोव्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या मारुती एस-प्रेसो कारचा चालक तिरुमल्लेश्वर लोकप्पा गौडा (रा. कर्नाटक) याचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत आदेश पेडणेकर गंभीर जखमी झाल्याने स्थानिकांच्या मदतीने त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला गोव्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news