Sindhudurg Accident : कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

सिंधुदुर्गनगरी- सुलोचना नगर येथील घटना
Sindhudurg Accident
कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी
Published on: 
Updated on: 

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गनगरी- सुलोचना नगर येथे मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायं. ३ वा. कार अपघातात २ जण जखमी झाले.

परशुराम लालप्पा लमानी (२७, रा. बागलकोट कर्नाटक, सध्या तळेरे ) हा मारुती स्विफ्ट कार घेऊन कणकवली ते कुडाळ जात होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती प्रथम महामार्गाच्या साईडच्या लोखंडी रेलिंग व लाईटच्या पोलला धडकली. त्यानंतर ती हवेत उडून नवनाथनगरकडे जाणाऱ्या मोटारसायकलवर पडली. या अपघातात बाईकस्वार व मागे बसलेल्या स्वाराला दुखापत झाली. दोन्ही वाहनांसह शासकीय रेलिंग व लाईट पोलचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी राहुल गौतम कांबळे (३४, रा. सिंधुदुर्गनगरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news