Shree Dev Ghodemukh Jatra | श्री देव घोडेमुख डोंगरावर भाविकांची गर्दी

देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात साजरा; नवस फेडण्याची लगबग
Shree Dev Ghodemukh Jatra
देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात साजराpudhari
Published on
Updated on

सावंतवाडी : दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी भक्तिमय वातावरणात भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा झाला. या जत्रोत्सवाला सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी दिसून आली. भाविकांकडून श्री देव घोडेमुखाला हजारो कोंबड्यांचा मान देण्यात आला. भक्तांच्या हाकेला धावणारा शिवमार्तंडेश्वर व ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्री देव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. सावंतवाडी शिरोडा मार्गावर सावंतवाडीपासून साधारण १५ किलोमीटरवर रस्त्याला लागून असलेल्या निसर्गरम्य डोंगराच्या एका टोकावर हे देवस्थान आहे. जत्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच श्री देव घोडेमुखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. मंदिर डोंगरावर असल्याने वयोवृद्ध भाविकांना डोंगर चढणे अवघड असल्याने डोंगराच्या पायथ्याशी केळी, नारळ ठेवण्याची व्यवस्था देवस्थानकडून करण्यात आली होती. तर बऱ्याच संख्येने भाविकांनी तब्बल ७०० ते ८०० मीटर डोंगर चढून जात श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले. जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासाहित मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर व इतर भागातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. 'कोंबड्याची जत्रा' म्हणून ही जत्रा प्रसिद्ध असल्याने तसेच श्री देव घोडेमुखाला कॉव्यांचा मान दिला जात असल्याने जत्रोत्सव परिसरात मोठ्यां प्रमाणे कोंबडे विक्रीसाठी आले होते. हे कोंबडे खरेदीसाठी भाविकांची गर्दी व लगबग दिसून येत होती.

दुपारनंतर भाविकांची गर्दी बाढत गेली. परिणामी सावंतवाडी-शिरोडा मार्गावर तब्बल तीन ते चार तास वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वेंगुर्ले पोलिस ठाण्याकडून वाहतूक कोंडीची समस्या गृहीत धरून आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने काहीअंशी वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिस कर्मचाऱ्यांना यश आले. मात्र सातत्याने रस्त्यावरून वाहने ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडी वारंवार निर्माण होत होती.

शनिवारी सायंकाळी ४.३० वा. मातोंड सातेरी मंदिर येथून तरंग देवतांचे आगमन झाल्यानंतर खच्या अथनि या जत्रोत्सवाला सुरुवात झाली. यानंतर देवस्वाऱ्या डोंगर चढून घोडेमुख मंदिरात पोचल्यानंतर धार्मिक विधिंना सुरुवात झाली. यानंतर गावकायऱ्यांकडून घोडेमुखच्या चाळ्यांना प्रथम गावकरी, मानकरी यांनी कॉव्याचा मान दिल्यानंतर भाविकांच्या कोंबड्यांचा मान देण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाविकांकडून मोठी झुंबड पाहायला मिळाली. ही प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर सायंकाळी उशिरा देवस्वाऱ्या अवसारी परत सातेरी मंदिराकडे निघाल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता झाली. दरवर्षी पेक्षा जत्रोत्सवाला भाविकांनी अफाट गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news