

फोंडाघाट : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक शिवसेना प्रसंगी स्वबळावर लढेल, असे सुतोवाच शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सावंतवाडी येथे केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती की स्वबळावर लढायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठ घेतील. पण वेळ आलीच तर ही निवडणूक स्वबळावर लढण्यास शिवसेना तयार असल्याचे ना. कदम यांनी सांगितले.
ना. कदम म्हणाले, शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिलीय त्या अनुषंगाने हा आपला सिंधुदुर्ग दौरा आहे. माझ्याकडे जनतेशी निगडित महत्त्वाची खाती आहेत. त्या खात्यामार्फत जनतेचे प्रश्न सोडविले जातील.
संघटना बांधणीचर कला आम्ही लहानपणापासून अवगत केली आहे. शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेना साथ दिली आहे. संघटना बांधणी हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पक्ष संघटना बळकटीच्या दृष्टीने हा आपला दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.