

सावंतवाडी : पुणे जिल्ह्यातील चाकण काळेवाडी येथे मैत्रिणीच्याच घरी सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावंतवाडीतील एका महिलेला चाकण पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. या वृत्ताला सावंतवाडी पोलिसांनी दुजोरा दिला. समीक्षा साई प्रसाद राऊळ असे या संशयित महिलेचे नाव आहे.
सावंतवाडी येथील समीक्षा ही चाकण-काळेवाडी येथे आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. दरम्यान तिने मैत्रिणीच्या घरातील दागिने चोरले अशी तक्रार तिच्या मैत्रिणीने चाकण-काळेवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चाकण पोलिस ठाण्यात समीक्षा राऊळ हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तपास सुरू होता.
दरम्यान सोमवारी उशिरा चाकण पोलिसांच्या पथकाने सावंतवाडीत येत तिला ताब्यात घेतले. तिचे मोबाईल लोकेशन हे सावंतवाडी जेल परिसरात मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनीसिावंतवाडी पोलिसांच्या मदतीने जेल परिसरात ही कारवाई केली. याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दुजोरा दिला.