Sindhudurg News| सावंतवाडी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांचा राजीनामा

चुकीच्या आरोपांमुळे निर्णय घेतल्याचा दावा
Sindhudurg News
सावंतवाडी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांचा राजीनामा
Published on: 
Updated on: 

​सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्यावर झालेल्या चुकीच्या आणि बिनबुडाच्या आरोपांमुळेच आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी जाहीर केले.

श्री. बांदेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला राजीनामा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या बैठकीत त्यांनी स्वतः याबाबतची अधिकृत घोषणा केली.​ त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रतीक बांदेकर म्हणाले, माझ्या कार्यकाळात पाणीपुरवठा विभागाचे काम सुरळीत ठेवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर चुकीचे आणि गैरसमजातून आरोप केले जात आहेत.

या नाहक आरोपांमुळे व्यथित होऊन मी दोन दिवसांपूर्वीच सभापती पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः आणि पक्ष यामुळे बदनाम होत असून खरं काय आणि खोटं काय हे समजेलच माझा यामध्ये कोणताही दोष नव्हता आणि नाही उलट हा भ्रष्टाचार मी उघड केला आणि बिल अदा न करण्याचे आदेश दिले होते, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news