सावंतवाडीतील आगामी निवडणुका स्वबळावर

Sawantwadi elections: भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांची माहिती
Sawantwadi elections
सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत बोलताना महेश सारंग, युवराज लखमसावंत भोंसले, पुखराज पुरोहित,सुधीर आडीवरेकर आदी.pudhari photo
Published on
Updated on

सावंतवाडी ःआगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणूक तसेच अन्य निवडणुका बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वबळावर लढवल्या जाणार आहेत. पक्षाचे वरिष्ठही या मागणीला साथ देतील, त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष बसवून ‘कमळ’ फुलवणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सारंग यांनी रविवारी येथील भाजपा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम भोंसले, ज्येष्ठ कार्यकर्ते पुखराज पुरोहित, माजी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, राजू बेग, अनिल निरवडेकर,आनंद नेवगी, उदय नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सारंग म्हणाले, प्रदेश पातळीवर तसेच जिल्हा कोअर कमिटी माध्यमातून सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील अन्य दोन मंडल अध्यक्षांचीही निवड उद्यापर्यंत जाहीर होणार आहे. ही निवड खा. नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे ,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. एकूणच शहर मंडल अध्यक्षांची नव्याने निवड करत असताना आगामी काळात शहराचा सर्वांगीण विकास नजरेसमोर ठेवून तशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथ स्तरावरील समस्या जाणून घेऊन तेथील विकासकामे यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. याचबरोबर शहरातील समस्या यामध्ये प्रामुख्याने शहराच्या सीमावर्ती भागातील कचर्‍याची समस्या तसेच ड्रेनेजची समस्या आदी सोडवण्यादृष्टीने यापुढील काम राहणार आहे.

भाजपच्या माध्यमातून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी याआधी मोठ्या प्रमाणात भरीव निधी देण्यात आला आहे. यापुढेही जास्त मोठा निधी देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आगामी नगरपालिका तसेच अन्य निवडणुका स्वबळावर लढवल्या जाणार आहेत. सध्या तरी शिवसेनशी युती करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ता तयार नाही. तशा प्रकारची मागणीही आम्ही वरिष्ठ स्तरावर केली आहे. या मागणीला वरिष्ठ साथ देणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे. आंबोली आणि शिरशिंगे येथे झालेला शिवसेनेतील प्रवेश हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा नव्हता, असा दावा त्यांनी केला.

संजू परब यांच्यावर टीका

ज्या लोकांना राजकारणात भाजपने पद, चेहरा आणि ओळख दिली. आज तेच लोक भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु भाजपा त्यागातून उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते फोडणे त्यांना सहज शक्य नाही,असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमूख संजू परब यांना लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news