सावंतवाडी टर्मिनसचा समावेश ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत करावा

Sindhudurg Railway News | कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
Sindhudurg Railway News |
सावंतवाडी टर्मिनसचा समावेश ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत करावा अशी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने मागणी केली.File Photo
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या प्रलंबित कामाचा केंद्राचा महत्त्वाकांक्षी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत समावेश करावा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी केली आहे.

याबाबत संघटनेने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 23 डिसेंबर 2022 ला रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत स्थानक’ योजना जाहीर केली. ही योजना रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोनातून तयार केली आहे. यामध्ये त्या त्या स्थानकांचा आराखडा तयार करणे आणि त्याला टप्प्याटप्प्याने अंमलात आणणे समाविष्ट आहे.

यामध्ये स्थानकात पुरेशी आगमन-निर्गमन व्यवस्था, अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय, लिफ्ट, आवश्यकतेनुसार सरकते जिने, मोफत वाय-फाय सुविधा, स्थानिक उत्पादनांसाठी किओस्कची स्थापना आणि ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या योजनेचे स्टॉल्स, प्रवासी माहिती प्रणालींचा विकास, व्यवसाय बैठकीसाठी जागा निश्चित करणे आणि प्रत्येक स्थानकाच्या विशेष आवश्यकतांची पूर्तता करणे, आवश्यकतेनुसार नवीन प्लॅटफॉर्मची बांधणी, त्यावर असणारा निवारा, फूट ओवर ब्रीज आदी कामांचा समावेश आहे. याच बरोबर या योजनेत स्थानकांच्या संरचनांचे अद्ययावतन करणे, स्थानकांना दोन्ही बाजूंना शहरी भागांशी जोडणे, बहु-उद्देशीय कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देणे, अपंग व्यक्तींसाठी (दिव्यांगजन) सुविधा प्रदान करणे, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाययोजना लागू करणे, बॅलास्टलेस ट्रॅकची बांधणी करणे, आवश्यकतेनुसार रूफ प्लाझाचे बांधकाम आदी कामांवर जोर दिला आहे.अंतिम उद्दिष्ट म्हणजे या स्थानकांना दीर्घकालीन दृष्टिकोनातून शहरी केंद्रांमध्ये रूपांतरित करणे आहे.

25 हजार कोटींच्या या योजनेत देशभरातील एकूण 1275 स्थानकाचा समावेश करण्यात आला परंतु कोकणातील एकाही स्थानकाचा त्यात समावेश नाही. कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यातील मडगाव आणि काही महिन्यांनी कर्नाटक येथील लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांचा हट्टापायी उडपी स्थानकाचा समावेश या योजनेत करण्यात आला. सावंतवाडी स्थानकाचाही समावेश या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत करून या ठिकाणी टर्मिनस बिल्डिंग, नवीन प्लॅटफॉर्म, परिपूर्ण शेड, सरकते जिने, आवश्यकते नुसार लिफ्ट, नवीन टर्मिनस लाइन, सध्याचा ब्रीजचा विस्तार आदी कामांना या योजनेतून थेट केंद्राचा निधी मिळेल. या साठी खासदार, आमदार यांनी याचा आवश्यक तो पाठपुरावा करावा ही कोकणवासियांची अपेक्षा असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news