Dashavatar Mahotsav 2026 : सावंतवाडी राजवाडा येथे 7 ते 10 जानेवारीपर्यंत दशावतार महोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लोककला आविष्कार असलेला दशावतार
Dashavatar Mahotsav 2026
सावंतवाडी राजवाडा येथे 7 ते 10 जानेवारीपर्यंत दशावतार महोत्सव
Published on
Updated on

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व लोककला विभाग आयोजित ‌‘लोककला महोत्सव-2026‌’ च्या अंतर्गत चौथा दशावतार महोत्सव 7 ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये राजवाडा सावंतवाडी येथे सायं. 6.30 ते 10 वा. पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

Dashavatar Mahotsav 2026
Ratnagiri News : सोळजाई मंदिरात रेखाटली भव्य दशावतार रांगोळी

दिव्यलोकीचा आभास निर्माण करणारी, इंद्रधनुष्य रंगांची उधळण करणारी रंगभूषा व वेशभूषा, उत्कृष्ट खटकेबाज उत्स्फूर्त संवादाची जोड लाभलेला रांगडा अकृत्रिम अभिनय, पखवाज किंवा तबला, पायपेटी आणि झांजेची लायकारी साथ लाभलेले संगीत या वैशिष्ट्यांसह भाविक लोकरंगभूमीवर अवतीर्ण होणारा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लोककला आविष्कार म्हणजे आपला दशावतार.

जुनी पारंपरिक दशावतार कला जिवंत ठेवण्यासाठी तिथे जतन करण्यासाठी व ती वृद्धिंगत करण्यासाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशाने संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखम सावंत-भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने हा पारंपरिक दशावतार मंडळांचा दशावतार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवांतर्गत सादर होणारी नाटके

7 जानेवारी रोजी सायं. 6.30 वा. नाईक मोचेमांडकर दशावतार लोकनाट्यमंडळ-मोचेमांड यांचा ‌‘नीलमाधव‌’ व रात्री 8.30 वा. कलेश्वर नाट्य मंडळ नेरुर यांचा ‌‘गोमय गणेश‌’. 8 जानेवारी रोजी सायं. 6.30 वा.दत्त माऊली नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‌‘वेसरोत्पत्ती‌’ तर रात्री 8.30 वा. जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली-आरोस यांचा ‌‘गरुड गर्वहरण‌’. 9 जानेवारी रोजी सायं. 6.30 वा. चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ-चेंदवन यांचा ‌‘भक्ती महिमा‌’ तर रात्री 8.30 वा. श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ-दोडामार्ग यांचा ‌‘चौरंगीनाथ‌’. 10 जानेवार रोजी चेंदवणकर-गोरे दशावतार मंडळ, कवठी यांचा ‌‘क्षणमुखासूर रूपिणी संहार‌’ व रात्री 8.30 वा. श्री देवी माऊली नाट्य मंडळ इन्सुली यांचा ‌‘धर्मविजय‌’ प्रयोग सादर केला जाणार आहे. या दशावतार महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.

Dashavatar Mahotsav 2026
Kantara vs Dashavatar : ‘कंतारा’च्या लाटेत ‘दशावतार’चा गड मजबुतीने उभा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news