सावंतवाडीला कुणकेरी धरणातून जुलैपर्यंत पाणीपुरवठा

Kunkeri dam: नवीन पाणीपुरवठा योजनेचे 40 टक्के काम पूर्ण
Sawantwadi water supply
कुणकेरी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. (छाया ः हरिश्चंद्र पवार)
Published on
Updated on
सावंतवाडी ः हरिश्चंद्र पवार

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कुणकेरी धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरेल, अशी माहिती सावंतवाडी नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता संतोष भाऊ भिसे यांनी दिली आहे. शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही वेगाने सुरू असून, आतापर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.

धरणातील पाणीसाठा आणि इतर जलस्रोत कुणकेरी धरण प्रकल्पात सध्या 11 मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. याव्यतिरिक्त, शहराला केसरी गुरुत्वाकर्षण झर्‍याच्या योजनेतून दररोज 5 लाख लिटर पाणी मिळते, तर नरेंद्र डोंगर येथील उद्भवातून सध्या 4 लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात हे प्रमाण 7 लाख लिटरपर्यंत वाढते. यावर्षी कुणकेरी धरणात 18 मीटर पाणीसाठा होता, परंतु तीव्र उष्णतेमुळे पाण्याची पातळी घटली आहे.

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सावंतवाडी शहरातील 3500 नळ कनेक्शनसाठी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. उभा बाजार, माठेवाडा आणि नरेंद्र डोंगर येथील पाणी साठवण टाकीतून नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवले जाते. केसरी आणि चिवार टेकडी येथील पाणी बिरोडकर टेंब, खासकिलवाडा भागात पुरवले जाते.

नवीन पाणीपुरवठा योजना

सावंतवाडी शहरासाठी 56.17 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर सावंतवाडीकरांना दिवसातून तीन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पाईपलाईनला समांतर नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. पाईप टाकताना रस्त्यांची खोदाई किंवा खड्डे झाल्यास ते तत्काळ दुरुस्त केले जातील. तसेच, या नवीन पाणीपुरवठा योजनेची पुढील दोन वर्षे ठेकेदाराकडून दुरुस्ती केली जाणार आहे, असे अभियंता संतोष भाऊ भिसे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news