

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात 21 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. आज (दि.२) गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश भक्तांनी सुमारे ६ हजार मोदक श्रींना अर्पण केले.
आज सोमवारी संकष्टी दिवशी सकाळी ६.३० वाजता श्रींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. (Sawantwadi)
यावेळी श्रींच्या महापुजेचा मान ज्येष्ठ नागरिक अण्णा म्हापसेकर व अक्षया म्हापसेकर यांना मिळाला. यानंतर वेद पाठशाळेच्या बटूनी श्री अथर्व शीर्ष पठण केले. त्यानंतर दुपारी महाआरती झाल्यावर श्रींना सहस्त्र मोदक अर्पण करण्यात आले.
यावेळी विविध प्रकारच्या या मोदकांची संख्या ६ हजार ५२८ इतकी झाली. वैश्यवाड्यातील गणेशोत्सवात प्रकाश मिशाळ, महादेव गावडे, शरद सुकी, मृणाल चेंडके, संकेत शिरसाट, झकास मित्र मंडळ, वैभव म्हापसेकर, धोंडी दळवी, मंगेश परब, लघुरुद्र – आनंद नेवगी, पंचखाद्य प्रसाद डॉ. गोविंद केसरकर हे गणेशोत्सवातील मानकरी आहेत. रोज रात्री भजनादी कार्यक्रम झाले. सोमवारी (दि.९) भव्य विसर्जन मिरवणुकीने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत वाद्यवृंद, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्यवाडा हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा