Sindhudurg burglary : कणकवलीपाठोपाठ आता सावंतवाडीतही चोरट्यांचा धुमाकूळ!

रात्रीत फोडली 7 दुकाने; पोलिसांच्या गस्तीवर नाराजी
Sindhudurg burglary
कणकवलीपाठोपाठ आता सावंतवाडीतही चोरट्यांचा धुमाकूळ!
Published on
Updated on

सावंतवाडी ः शुक्रवारी रात्री कणकवली शहरातील 8 दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी शनिवारी सावंतवाडी शहरात धुमाकूळ घातला. शहरातील सात दुकाने फोडून पोलिसांना जणू आव्हानच दिले. या चोरीमध्ये दोन दुकानांमधून चार हजारांची रक्कम चोरीस गेली. रविवारी सकाळी या चोऱ्या उघडकीस आल्या. काही दुकानांतील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गात भीती पसरली आहे. सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलाशेजारील 7 दुकानांच्या शटरचे लॉक उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. बिजली इलेक्ट्रॉनिक्सचे शटर लोखंडी रॉडच्या सहाय्याने उचकटले, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर याच व्यापारी संकुल समोरील न्यू सुरभि स्नॅक्स सेंटरचे शटर तोडून आतील दोन हजार रुपये लांबवले. कॉम्प्लेक्समधील तबरेज बांगी यांच्या दुकानाचे लॉक तोडून चोरटे आत प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले. बांगी यांच्या दुकानात त्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली.

त्यानंतर अशाच पद्धत्तीने बाजारपेठेतील शिरसाट, नार्वेकर, गुडलक बार आदी तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. त्यात त्यांच्या हाती म्हणावे तसे काही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी नगरपालिकेलगतची न्यू अयंगर बेकरी फोडून आतील दोन हजार रुपये चोरले. पहाटे साफसफाई करण्याकरिता काही दुकानांचे मालक आले असता या चोऱ्या उघडकीस आल्या. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक सरदार पाटील, पो. मंगेश शिंगाडे यांनी चोरी झालेल्या सर्व दुकानांचे पंचनामे केले. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा माग लागला नाही. श्वान तिथेच घुटमळले.

व्यापारी संघाची तीव्र नाराजी

शहरातील बहुतांशी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण झाल्या. दुकान व्यापारी तबरेज बांगी यांनी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. त्यावरुन घरफोडींचा तपास पोलिस करीत आहेत. या चोऱ्यांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरु असतानाही असे प्रकार घडल्याने व्यापारी संघाचे अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news