Sawantwadi crime : सावंतवाडीत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून विवाहितेचा मृत्यू

बिरोडकर टेंब, द्वारका नगरी परिसरातील घटना
Sawantwadi crime News
सावंतवाडीत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून विवाहितेचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

सावंतवाडी ः बिरोडकर टेंब, द्वारका नगरी परिसरात एका निर्माणाधीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने 20 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुबी खातून मुन्ना खान (मूळ रा. बिहार, सध्या रा. द्वारका नगरी) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री 9 वा.च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सावंतवाडी शहरातील द्वारका नगरी परिसरात एका सात मजली इमारतीचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा.च्या सुमारास रुबी खातून यांच्या खोलीतील वीज गेली होती. त्यामुळे ट्यूबलाईट आणण्यासाठी त्या पतीसोबत चौथ्या मजल्यावर गेल्या होत्या. अंधारात ट्यूबलाईट जोडण्याचे काम सुरू असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट चौथ्या मजल्यावरून खाली पडल्या.

अपघातानंतर त्यांना तातडीने मोटारसायकलवरून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रात्री 9 वा.च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आणि पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सावंतवाडी पोलिस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेचे नातेवाईक बिहारहून सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news