Sindhudurg News : ‘मल्टिस्पेशालिटी’च्या जागेचा मार्ग मोकळा!

न्यायालयीन तडजोडीनंतर आ. दीपक केसरकर यांची माहिती
Deepak Kesarkar
मंत्री दीपक केसरकर.(File photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडीतील बहुप्रतीक्षित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, रुग्णालय उभारणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात राजघराण्याच्या दोन्ही कुटुंबांमध्ये यासंदर्भात तडजोड झाली आहे. या निर्णयाचे मूळ श्रेय न्यायालयालाच जाते, अशी प्रतिक्रिया आ. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते दिल्लीहून झूम मीटिंगद्वारे पत्रकारांशी बोलत होते.

न्यायालयाने जनहित लक्षात घेत तातडीने ५० गुंठे जागा चार आठवड्यांत हस्तांतरित करण्याचे आणि उर्वरित जागेवर शासनाने रुग्णालय बांधण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी प्रभावी बाजू मांडल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्य अधिवक्ता ॲड. शिशिर हिरे यांचे विशेष आभार मानले. तसेच सावंतवाडीचे राजेसाहेब खेम सावंत, युवराज लखमराजे सावंत आणि श्री व सौ. भोगले घराण्याने वेळेवर प्रतिज्ञापत्रे सादर करून मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णालयाची पार्श्वभूमी आणि नवी रूपरेषा

रुग्णालयाला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती व २०१९ मध्ये ३८ कोटी रुपये मंजुरीसह भूमिपूजन करण्यात आले होते; मात्र जागेच्या वादामुळे काम रखडले होते. सुधारित योजनेनुसार आता या प्रकल्पावर ₹८० कोटी खर्च होणार आहेत. सावंतवाडीवासीयांना १०० + १०० अशा एकूण २०० खाटांची रुग्णसेवा मिळणार असून, इमारत सात मजली असणार आहे.

अद्ययावत ऑपरेशन्स सुविधा

कॅन्सर, ब्रेन सर्जरी, हार्ट सर्जरी आणि युरीन सर्जरी अशा ४ प्रकारच्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध होईल. फेरनिविदा प्रक्रिया पार पाडून येत्या २ ते ३ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news