संजय पडते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

Shiv Sena expansion: आंगणेवाडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश
Sanjay Padte joins Shiv Sena
आंगणेवाडी : ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय पडते यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आ. नीलेश राणे, दत्ता सामंत व अन्य.pudhari photo
Published on
Updated on

मसुरे ःकोकणात शिवसेना महायुतीचा भगवा झंझावात सर्वत्र दिसून येत आहे. नीलेश राणे आमदार झाल्यापासून येथील शिवसेना संघटना जोमाने वाढत आहे. सोबतच विकासकामांचा धडाकाही सुरू असून, तोही असाच सुरू राहणार आहे. मागील अडीज वर्षाच्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती जनतेने ऐतिहासिक विजयाच्या स्वरूपात दिली. यापुढेही जनतेचा विश्वास सार्थकी लावून महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेची सेवा करतंच राहणार, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मालवण दौर्‍यात दिली.

दरम्यान, सिंधुदुर्ग दौर्‍यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला धक्का दिला. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह आजी माजी सरपंच व शेकडो उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार नीलेश राणे यांसह उपस्थित पदाधिकार्‍यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

आंगणेवाडी श्री भराडी देवीचे दर्शन

कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परिसरातील एका निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. संजय पडते यांसह गिरगांव कुसगाव सरपंच स्नेहा सावंत, यांसह असंख्य कार्यकर्ते, गोवेरी येथील कार्यकर्ते, माडयाची वाडी, सोनवडे तर्फ तुलासुली, रांजना येथील शेकडो उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांसह मुंबई येथील काँग्रेस पदाधिकारी व मूळ तळाणी आंगणेवाडी येथील सुनील आंगणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार रवींद्र फाटक, आ. नीलेश राणे, आ. किरण सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, संजू परब, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, आंनद शिरवलकर, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, बाळू नाटेकर, बंटी तुळसकर, अरविंद करलकर, दादा साईल, रत्नाकर जोशी, किसन मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विनायक राणे, आबा धडाम, हर्षद पारकर, दीपलक्ष्मी पडते, सरोज परब, नगरसेविका चांदणी कांबळी, नैना मांजरेकर, श्रुती वर्धम, उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, सोनाली पाटकर, अंजना सामंत, सिद्धी शिरसाठ, तुळसकर, नाटेकर, सुनील घाडीगावकर, सुशांत घाडीगावकर, मकरंद राणे, छोटू ठाकुर, प्रितम गावडे, दिलीप बिरमोळे, ऋषिकेश सामंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दत्ता सामंत म्हणाले, आ. नीलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेना जोमाने वाढत आहे. विकास कामे गतिमान होत आहेत. हे असेच सुरू राहणार आहे.

ना. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येऊ देत. महाराष्ट्र प्रगती, विकासाकडे वाटचाल करत असताना सुजलाम् सुफलाम् होऊ देत असे साकडे कुणकेश्वर, आंगणेवाडी भराडी देवी चरणी घातले. आमदार नीलेश राणे यांनी मागणी केल्याप्रमाणे आंगणेवाडी येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या बजेटमध्ये तरतूद केली जाईल. मोबाईल टॉवर प्रश्नही सोडवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘हा ट्रेलर... पिक्चर अभी बाकी है’ : संजय पडते

संजय पडते म्हणाले, शिवसैनिक शाखाप्रमुख म्हणून नारायण राणे यांच्या नेतृत्वात काम केले. त्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला; मात्र काही गैरसमजातून दहा वर्षापूर्वी बाजूला गेलो. मात्र, आता पुन्हा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. अनेक पदाधिकारी आजी माजी शिवसैनिक शेकडो कार्यकर्ते सोबत आहेत. मात्र, ‘हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’ असे संजय पडते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news