SSC Exam Scam : दहावीच्या उत्तरपत्रिकेमध्ये वेगवेगळे हस्ताक्षर

शिक्षकाने आपल्या मुलासाठी केला प्रताप; बोर्डाकडून चौकशी सुरू
SSC Exam
SSC Exampudhari
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरील शिक्षकाकडून कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. दहावीचे पेपर तपासणाऱ्या एका शिक्षकाच्या निदर्शनास असे आले आहे की, एक उत्तरपत्रिका आणि पुरवणी पत्रिकेत एकच हस्ताक्षर दिसते आहे. त्यामुळे त्या शिक्षकाच्या तक्रारीनुसार बोर्डाकडून चौकशी सुरू झाली आहे.

दरम्यान, हा प्रकार एका शिक्षकाने आपल्या मुलासाठी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परीक्षा केंद्रावर जाऊन रिलिव्हर असताना एका शिक्षकाने आपल्या मुलाला उत्तरे लिहिलेली पुरवणी जोडली होती अशी महत्वाची माहिती मिळाली आहे. शिक्षण विभागाकडून याची सखोल चौकशी झाल्यानंतर हे नेमके प्रकरण काय आहे हे जाहीर होईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

एका बाजूला नीट पेपरफुटीमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. वैभववाडी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरील दहावीचे पेपर एका शिक्षकाकडे तपासणीसाठी दिले होते. ही तपासणी करत असताना त्या शिक्षकाच्या लक्षात आले की अनेक उत्तरपत्रिकांमधील वाक्यांची मांडणी, लेखनाचा ढंग, शब्दरचना, अक्षरशैली एकसारखी आहे. ही अक्षरे इतकी हुबेहूब जुळली होती की त्यामुळे ही अक्षरे एकाच माणसाने लिहिल्याचे दिसते आहे. पेपर तपासणाऱ्या त्या शिक्षकाने लगेचच कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार शिक्षण मंडळाने म्हणजेच बोर्डाने लगेचच प्राथमिक चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये सुरूवातीलाच ती सामूहिक कॉपी झाला असल्याचा संशय बळावल्याने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक विभागाला याची चौकशी करावी असे आदेश बोर्डाने दिले. त्यानुसार उपशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आता संजय माने यांनी युध्दपातळीवर माहिती मिळविण्यास सुरूवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला लागणार गालबोट?

सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच दहावी, बारावी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येतो. विशेष म्हणजे कॉपीमुक्त परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात पुढे आहे. यावर्षी तर परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यावर्षीच्या दहावीच्या निकालामध्येही सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आला आहे. वैभववाडी केंद्रातील या प्रकारामुळे या यशाला गालबोट लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news