Sindhudurg Crime : निरुखे-सुतारवाडीत बंदूक निर्मिती कारखान्यावर छापा

तीन बंदुकांसह लाखोंचे साहित्य जप्त; संशयितास अटक
Sindhudurg Crime News
निरुखे-सुतारवाडीत बंदूक निर्मिती कारखान्यावर छापाfile photo
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे-सुतारवाडी येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध बंदूक निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी मध्यरात्री छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी 3 तयार बंदुका, 6 लोखंडी बॅरल आणि शस्त्रे बनविण्याचे साहित्य असा एक लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (65, रा. निरुखे सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून, कुडाळ न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्ह्यात सध्या ऑल आऊट ऑपरेशन राबविले जात आहे. याअंतर्गत एलसीबीचे पथक कुडाळ परिसरात गस्त घालत असताना निरुखे येेथे बंदुका बनविल्या जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना मिळाली. या आधारे पथकाने 27 एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास निरुखे येथे सापळा रचून छापा टाकला. यावेळी घटनास्थळावर शस्त्रनिर्मितीचे काम सुरू असल्याचे उघड झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news