राजकोट किल्ला शिवाजी महाराज पुतळा प्रकरण-डॉ. चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला

Malvan News | डॉ. चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला
Malvan News
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (संग्रहित छायाचित्र)Pudhari File Photo
Published on
Updated on

ओरोस : पुढारी वृत्तसेवा - मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी गुरुवारी फेटाळला.

पाटील याची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील याची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. या कामी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी आणि अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रूपेश देसाई यांनी काम पाहिले.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील याचेविरुद्ध विविध कलमान्वये मालवण येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रथम डॉ. पाटील याला अटक करून पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीन मिळण्यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. यावर गुरूवारी सुनावणी झाल्यानंतर जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news