Sindhudurg Priya Chavan Case | प्रिया चव्हाण जीवन संपवले प्रकरणी आपल्याला धमक्या

Rupesh Rawal statement | रूपेश राऊळः केसरकरांनी भूमिका स्पष्ट करावी
Sindhudurg Priya Chavan Case
सावंतवाडीः पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ. सोबत चंद्रकांत कासार, अशोक धुरी व अन्य.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संबंधित कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असताना, आपल्याला एका अनोळखी नंबरवरून धमकीचा संदेश आला, असा दावा उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्यासोबतचा फोटो पाठवून ‘आपला हितचिंतक’ असा संदेश पाठवण्यात आला. या संदेशाचा अर्थ काय समजायचा, अशा दहशतीला आपण भीक घालणार नाही, असे राऊळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान दहशतवादाविरोधात नेहमी आवाज उठवणारे आ. दीपक केसरकर या प्रकरणी गप्प का आहेत? त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी दिले.ते सावंतवाडी येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, अशोक धुरी, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, फिलिप्स रॉड्रिग्स, आशिष सुभेदार, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.

Sindhudurg Priya Chavan Case
Sawantwadi News | दगडांच्या फटीत पाणी गेल्याने भिंत कोसळली!

श्री.राऊळ यांनी सांगितले, सावंतवाडीत प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणावर चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे, परंतु संशयित आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळू नये, ही आमची मागणी आहे. संशयितांना अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. गरज पडल्यास सहआरोपी करून त्यांना न्यायालयात हजर करावे आणि प्रियाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्री. राऊळ यांनी केली.

Sindhudurg Priya Chavan Case
Sawantwadi Jail Tourism | सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृहात ‘जेल पर्यटन’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news