Sindhudurg Accident : तळेरेत डंपरची पादचाऱ्यास धडक; जागीच मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावर तळेरे बाजारपेठ येथे डंपरची पादचार्‍यास धडक लागून अपघात झाला. या अपघातात पादचारी रोहिदास देसाई यांचा जागीच मृत्‍यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ११ वाजता झाला.

तळेरेहून कणकवलीच्या दिशेने जाणार्‍या लेनवर पादचारी रोहिदास हरिश्चंद्र देसाई (रा. तळेरे गावठण) हे जात असताना याच लेनवरून आपल्या ताब्यातील डंपर घेऊन जाणारा चालक देवानंद साटम हा जात असताना त्याच्या डंपरची धडक रोहिदास देसाई यांना लागली. धडक लागून ते खाली पडल्यानंतर मागच्या चाकाखाली मिळाल्याने काही अंतर फरफटत गेल्याने त्यांना मोठी दुखापत झाली.

यावेळी स्थानिकांनी धाव घेत त्यांच्या देहाची पाहणी केली असता अनेक अवयव शरीरापासून बाजूला गेल्याचे दिसल्याने ते जागीच मृत झाले. नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळाली नसून, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी केली. मृत रोहिदास देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.