Pahalgam Terror Attack | दहशतवादी हल्ल्यातून बचावलेले पावसकर कुटुंबीय तळेरेत परतले

पालकमंत्री नितेश राणेंनी भेट घेत साधला संवाद
Sindhudurg News
तळेरे ः जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पावसकर कुटुंबीयांशी चर्चा करताना पालकमंत्री नितेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, बाळा जठार, संतोष कानडे आदी उपस्थित होते.
Published on
Updated on

नांदगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या इस्लामी आतंकवादी हल्ल्यातून सहीसलामत वाचलेले तळेरे येथील पावसकर कुटुंबीयांची भेट घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व सहाही जणांशी संवाद साधत तेथील परिस्थितीची व वस्तुस्थितीची माहिती घेतली. त्यांच्यासोबत डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जि.प. माजी सभापती बाळा जठार, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, सचिन पावसकर, योगेश पावसकर, सागर पावसकर, दिनेश मुद्रस, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे आदी उपस्थित होते.

तळेरे येथील तनय सचिन पावसकर, मिहीर योगेश पावसकर, ईशा योगेश पावसकर, साहिल सागर पावसकर, साक्षी संदीप पावसकर, ऋचा प्रमोद खेडेकर असे सहाजण जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. खरेतर ज्या दिवशी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्याच दिवशीही आम्ही सुद्धा पहलगामला जायचे निश्चित केले होते. मात्र, ऐन वेळी वातावरणातील बदलामुळे आम्ही पहलगाम भेटीची वेळ पुढे ढकलली. यामुळेे सुदैवाने आम्ही या हल्ल्यातून वाचलो.

मात्र, या दहशतवादी हल्ल्याची दाहकता आम्हाला संपूर्ण काश्मीर राज्यात जाणवत होती. विमानतळ आणि इतर सर्वच ठिकाणी याचे चित्र दिसत होते. सुदैवाने आम्हाला विमानाची तिकीटे वेळेत मिळाली आणि गुरुवारी सकाळी आम्ही सुखरूप तळेरे गावी पोहोचलो, अशी माहिती या पर्यटक पावसकर कुटुंबियांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news