Omkar elephant Sindhudurg news | ओंकार' हत्तीची पुन्हा सासोली गावात एन्ट्री

तीन दिवसांपूर्वी तो परमे गावात पोहोचला होता. तेथून तो सासोली परिसरात दाखल झाला आहे
Omkar Elephant
Omkar Elephant Pudhari
Published on
Updated on

दोडामार्ग : सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात परिचित असलेल्या 'ओंकार' हत्तीने सासोली गावात एन्ट्री केली आहे. पुन्हा एकदा तो गोव्याच्या दिशेने कूच करणार की बांदा परिसरात जाणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ऐन काजू हंगामात पुन्हा सासोली परिसरात 'ओंकार' दाखल झाला असून, काजू गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सासोली येथील जंगलात शेतकरी काजू गोळा करत असताना हा हत्ती त्यांच्या नजरेस पडला.

ऐन हंगामातच हत्ती दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी दिली. दरम्यान, वन विभागाची टीम हत्तीच्या मागावर असून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ग्रामस्थांनी विशेषतः काजू गोळा करताना जंगल भागात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. हत्तीच्या वावरामुळे काजू हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.

'ओंकार'ची सावंतवाडी, गोव्यात दहशत

ओंकार हत्ती हा डिसेंबर महिन्यात दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला. मात्र, तत्पूर्वी तीन महिने त्याने बांदासह सावंतवाडी तालुका व लगतच्या गोवा राज्यात दहशत माजवली होती. हल्ली तो 'बाहुबली' टस्करा सोबत केर, मोर्ले परिसरात वावरत होता. मात्र, तीन दिवसांपूर्वी तो परमे गावात पोहोचला होता. तेथून तो सासोली परिसरात दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news