

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी रंगत पहावयास संघ मिळाली. जि.प. व पं.स. साठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्यांपैकी एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यात कोलझर पं.स. गणातून सहा पैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने युतीचे खाते खोलले आहे. येथील उमेदवार तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र काहींनी पक्षाशी बंडखोरी करत निवडणुकीवर ठाम राहिले आहेत.
पं. स. गणात बहुरंगी लढती
पंचायत समिती मणेरी गणातून अजय परब (अपक्ष), विजय जाधव ( अपक्ष), आकांक्षा शेटकर( अपक्ष) व भगवान चंद्रकांत गवस (अपक्ष) यांनी उमेदवारी मागे घेतल्याने दीपक जाधव (बहुजन समाज पार्टी), प्रीती धुरी (ठाकरे शिवसेना), संजय देसाई (अपक्ष), प्रवीण गवस (अपक्ष), अनिरुद्ध फाटक (अपक्ष) व सोनिया कुबल (भाजपा) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. कोनाळ गणातून चेतना गडेकर (अपक्ष), स्वरा देसाई (अपक्ष), जेनिफर लोबो (अपक्ष), अश्विनी ठाकूर (अपक्ष) यांनी माघार घेतली असून सोनाली गवस (ठाकरे शिवसेना), साक्षी देसाई (अपक्ष) व सायली निंबाळकर (शिंदे शिवसेना) यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. साटेली -भेडशी गणातून गंगाराम जानू कोळेकर (अपक्ष), सिद्धेश गुरुनाथ कासार (ठाकरे शिवसेना), संदीप मोगरा नाईक (राष्ट्रीय काँग्रेस) व संजय पांडुरंग सातार्डेकर (भाजपा) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. झरेबांबर गणातून दीक्षा महालकर (अपक्ष) आकांक्षा शेटकर (अपक्ष) यांनी माघार घेतली असून स्नेहा गवस (शिंदे शिवसेना), विनिता घाडी (ठाकरे शिवसेना) व वृषाली गवस (अपक्ष) यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. माटणे गणातून प्रिया नाईक (ठाकरे शिवसेना), पार्वती गवस (भाजपा), सुप्रिया नाईक (अपक्ष) यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. कोलझर गणातून शिरीषकुमार नाईक (अपक्ष), यशवंत गवस (अपक्ष), प्रवीण परब (ठाकरे शिवसेना), सखाराम कदम (अपक्ष), दौलतराव महादेव देसाई (अपक्ष) या सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने युतीचे उमेदवार तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद शंकर गवस यांची बिनविरोध निवड झाली.
माटणे गटात भाजपमध्ये बंडखोरी
जिल्हा परिषद मणेरी गटात सुनिता भिसे (अपक्ष), ललिता ताटे (ठाकरे शिवसेना), साक्षी तळवडेकर (शिंदे शिवसेना) यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. साटेली-भेडशी गटातून श्रेयाली गवस, दीप्ती मयेकर, सुमन डिंगणेकर या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून सुनंदा धर्णे (ठाकरे शिवसेना) व श्वेता धर्णे (भाजपा) यांच्या दुहेरी लढत होणार आहे. माटणे गटातून रवींद्र गवस (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट), आपा वसंत गवस (अपक्ष), संजय कृष्णा गवस ( अपक्ष), एकनाथ अनंत नाडकर्णी (भाजपा अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतला असून बाबुराव धुरी (ठाकरे शिवसेना), लक्ष्मण गवस (अपक्ष), प्रकाश कांबळे (रिपब्लिकन-आठवले गट)), रामा दशरथ गवस (भाजपा) व राजेंद्र म्हापसेकर (भाजपा अपक्ष) यांच्यात लढत होणार आहे.