

कणकवली : जागतीक उर्जा संकट आणि आखाती देशातील युध्दजन्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेलचा कमीतकमी वापर करण्याचे आवाहन केले होते. त्याची अंमलबजावणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी करण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान ते मंत्रालयापर्यंत पायी चालत प्रवास केला. तसेच यापुढे इलेक्ट्रिक कार वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी इंधन बचतीबरोबच आरोग्य संतुलनाचाही संदेश दिला.
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरून मंत्रालयापर्यंत गुरूवारी बुलेट मोटरसायकलने आले. तर इतर मंत्र्यांनीही ईव्ही कार वापरण्यास सुरूवात केली आहे. मंत्री नितेश राणे यांनीही गुरूवारी कुठल्याही कारचा वापर न करता त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून पायी चालत मंत्रालयात पोहोचले. मंत्र्यांसोबत त्यांचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते.