

कणकवली : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील बंदरे खात्यांतर्गत सुरू असलेल्या महत्वपूर्ण विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीत राज्यातील आगामी सागरी पायाभूत सुविधा, बंदर विकास प्रकल्प आणि लॉजिस्टिक हबच्या योजनांवर विशेष लक्ष केंद्रीत करत सकारात्मक निर्णय घेण्यावर भर दिला. या चर्चेमुळे महाराष्ट्रातील सागरी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.