Nitesh Rane : कुणकेश्वर यात्रोत्सवात कापडी पिशवीचाच वापर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे भाविकांना आवाहन
Nitesh Rane
कुणकेश्वर यात्रोत्सवात कापडी पिशवीचाच वापर करा
Published on
Updated on

विजयदुर्ग ः श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाविकांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक यात्रा साजरी करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

यात्रेत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने कापडी पिशव्यांचा पर्याय स्वीकारणे काळाची गरज असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून यात्रेदरम्यान जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून भाविकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे यंदा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news