

ओरोस : काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी जगद्गुरू नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी शब्दात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळ समितीने निषेध मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. आ. वडेट्टीवार यांनी माफी न मागितल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.
जगद्गुरू नरेंद्रजी महाराज भक्तसेवा मंडळ जिल्हा सेवा समितीचेे पीठ प्रमुख सुदीन तेंडुलकर, जिल्हाध्यक्ष दिनेश मुंबरकर, मुख्यपीठ सहायक दीपक खरडेजनम, प्रवचनकार प्रिया परब, विलास परब, सिद्धी बोंद्रे, रमिला बागकर, तन्वी मोर्ये, रेश्मा नाईक, गौरी खोचरे, पद्मानंद करंगुटकर, अभिषेक राऊत आदींसह जिल्ह्यातील नरेंद्र महाराजनांचे या मोर्चात सहभागी झाले होते.
काँग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे नरेंद्र महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबाबत अनुद्गार काढल्याने देशभरातील श्री नरेंद्रभक्त आक्रमक झाले आहेत. आ. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील नरेंद्रभक्त येथे एकवटले होते. या भक्तांनी सिंधुदुर्गनगरी तिठा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढला. यावेळी आ. वडेट्टीवार यांच्या निषेधच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल होताख आ. वडेट्टीवार यांच्या निषेधाचे फलक फाडत त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात नरेंद्र भक्तप्रेमी महिला उपस्थित होत्या.
जगद्गुरू रामानंद स्वामी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल एकेरी शब्दाचा वापर करून केलेल्या त्यांच्या अपमानाबाबत आ. वड्डेटीवार यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवदेन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना सादर करण्यात आले. आमच्या जगद्गुरूचा आम्ही अपमान सहन करणार नाही. आम्ही या घटनेचा निषेध करतो. हिंदूंच्या भावना यामुळे दुखावल्या असून अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीबाबत आम्हाला किव वाटते. अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा वापरणार्या वडेट्टीवार यांना माफी नाही असे पीठ प्रमुख सुधीन तेंडुलकर यांनी सांगितले.