Devgad Nuclear Power Project | देवगडमधील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला खा. नारायण राणेंचे समर्थन

विरोधासाठी विरोध नको; प्रकल्प रोजगाराभिमुख, तो होणे काळाची गरज
खा. नारायण राणे यांचेे स्वागत करताना ॲड. अजित गोगटे, बाळा खडपे, राजा भुजबळ व पदाधिकारी.
खा. नारायण राणे यांचेे स्वागत करताना ॲड. अजित गोगटे, बाळा खडपे, राजा भुजबळ व पदाधिकारी. (छाया : वैभव केळकर)
Published on
Updated on

देवगड : माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी जामसंडे येथील भाजपा कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन स्थानिक प्रश्न व विकासकामांबाबत निवेदने देत त्यांचे लक्ष वेधले. दरम्यान, देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाचे नारायण राणे यांनी समर्थन करत हा प्रकल्प रोजगाराभिमुख असल्याने तो होणे काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

माजी आमदार ॲड. अजित गोगटे, बाळा खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, न. पं. गटनेते शरद ठुकरूल, भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, महिला मोर्चा देवगड तालुकाध्यक्ष उष:कला केळूस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, जि.प. महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच देवगड गटविकास अधिकारी नीलेश जगताप, न. पं. मुख्याधिकारी गौरी पाटील उपस्थित होते.

नारायण राणे यांनी तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला समर्थन दर्शविले. प्रत्येक प्रकल्पाला विरोधासाठी विरोध करू नका. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

मच्‍छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू

मच्‍छीमार संस्थांच्या प्रतिनिधींनी मच्‍छीमार नौकांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या डिझेलच्या वर्गीकरणासंदर्भातील प्रश्नाबाबत नारायण राणे यांना निवेदन दिेले. शासनस्तरावर पाठपुरावा करून मच्‍छीमारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन राणे यांनी त्यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news