नांदगाव मोरयेवाडी येथे बंद घराला आग; घरासह दुकान जळून बेचिराख

Fire accident: लाखो रूपयांचे नुकसान
Fire accident
नांदगाव मोरयेवाडी येथे बंद घराला लागलेली आग.pudhari photo
Published on
Updated on

नांदगाव : कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरयेवाडी येथील श्री मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली. या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात आणताना कठीण जात होते.

मुंबई गोवा महामार्गावर बिडये कुटुंबियांच्या घराला आग लागली. बिडये कुटूंबिय मुंबई येथे वास्तव्यास असतात. तर सुनंदा बिडये या आजी येथे असतात. मात्र तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपुर्वी या आजी मुंबई येथे गेल्या होत्या. तर याच घरात किराणा मालाचे लवू राजाराम लाड हे दुकान चालवितात. मात्र हे दुकानही एक महिन्यापासून बंद आहे. सुमारे ८:३० च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यानंतर स्थानिकांकडून अग्निशामक दलाला कळविण्यात आले. एक तासाने बंब दाखल झाला. तोपर्यंत आगीने संपूर्ण घर आपल्या विळख्यात घेऊन रौद्र रूप धारण केले. यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले.

ही घटना समजताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. याचवेळी घरात असलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने नागरिकही भयभीत झाले. ही आग नेमकी कशी लागली याचे नेमके कारण कळले नसले तरी शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची खबर मिळताच कणकवली व कासार्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news