Sindhudurg News | हार - फुलं विकून मातेने दिले स्वप्नांना बळं, मुलगा CRPF मध्ये भरती : भावनिक व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील....!

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील आई - मुलाचा भावनिक व्हिडीओ
Sindhudurg News
हार - फुलं विकून मातेने दिले स्वप्नांना बळं, मुलगा CRPF मध्ये भरती Pudhari Photo
Published on
Updated on

कुडाळ : दुपारी उन्हातानात रस्त्‍यावर फुलं विकत बसलेली माऊली एवढ्यात तिचा मुलगा धावत आला व थेट तिच्या पायावर नतमस्तक झाला. तो घेऊन आला होता CRPF मध्ये भरती झाल्याची बातमी घेऊनच. काबाडकष्टाने काढलेल्या इतक्या वर्षाच्या कष्टाचे चीज झाले होते याचे श्रेय आईचे याची जाण ठेवून तो आईच्या चरणी डोके ठेवले. या माऊलीनेही आपल्या मुलाला जवळ घेतले व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले आईबरोबर मुलाच्याही भावनांचा बांध फूटला व दोघांच्या डोळयातून पाणी घळाघळा वाहू लागले. या आई मुलाचे प्रेम पाहून त्‍याच्या मित्रांसह आजूबाजच्या लोकांच्याही डोळयाच्या कडा पाणावल्या.

आज सिआरपीएफ भरतीचा निकाल लागला. यामध्ये पिंगुळी जवळील शेटकरवाडीतील गोपाळ सावंत याची निवड झाली. गोपाळच्या कष्टाचे चीज झाले होते.निवडीची आनंदाची बातमी त्‍यांने आपल्या आईला जेव्हा दिली त्‍यावेळी त्‍यांच्या मित्रांनी या घटनेचा व्हिडओ केला या दोघांची या भेटीचा या व्हिडीओने अनेकजण भावूक झाले.

या निवडीनंतर गोपाळच्या मित्रांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. आईला भेटल्यानंतर या दोघांवरही गोपाळच्या मित्रांनी गुलालाची उधळण केली. कुडाळ नगरपंचायतीच्या फुटपाथवर बसून उन्हातान्हात हार-फुलं विकणाऱ्या एका कष्टकरी आईच्या आयुष्याचं सोनं झालं.

गोपाळच्या यशामागे आईचे कष्ट

कुडाळच्या रस्त्‍यावर अनेक वर्षापासून गोपाळ सावंत याची आई हार फुले विकते. गरीब परिस्थिती आणि कष्ट करुन तिने आपल्या मुलाला लहानाचे मोठे व शिकवलेही. गोपाळने आईची संसारासाठी व आपल्या शिक्षणासाठीचे कष्ट जवळून पाहिले होते. त्‍यामुळे आईसाठी काहीतरी करायचे व चांगली नोकरी पकडायची असा चंग गोपाळने बांधला होता. यातून त्‍याने लष्कर भरतीसाठी प्रयत्‍न सुरु केले. आणि त्‍याला देशसेवेची संधी मिळाली आहे. सीआपीएफमध्ये त्‍याची निवड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news