
Savdav Waterfall
नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) : मुंबई- गोवा महामार्गापासून अवघ्या सात किमी अंतरावर असणाऱ्या कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हासह राज्य आणि परराज्यातील पर्यटकांची येथे गर्दी वाढू लागली आहे.
हा धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. डोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन हा धबधबा खाली कोसळतो.
सिंधुरत्न योजनेतून या पर्यटनस्थळाचा कायापालट करण्यात आला आहे. यामुळे हे पर्यटनस्थळ पर्यटकांना आकर्षित करत आहे.
सावडाव धबधबा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
कणकवलीपासून अवघ्या १६ किमी अंतरावर तर मुंबई- गोवा महामार्गावरील सावडाव फाट्यावरून ७ किमी अंतरावर हा धबधबा आहे. गगनबावडा घाट आणि फोंडाघाट घाट मार्गेदेखील या ठिकाणी येता येते.