prajakta mali : प्राजक्ता माळीने उघडलेल्या बाजाराचे शटर बंद

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची कुडाळमध्ये कारवाई
Sindhudurg News
कुडाळ : तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे​ व करण गावीत.
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ कॉलेज चौकानजीक मुंबई-गोवा महामार्गालगत अत्यंत दिमाखात सुरू झालेल्या स्टोअरवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत व्यवसाय बंदची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच बुधवारी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते या स्टोअरचा शुभारंभ करण्यात आला होता. उद्घाटन सोहळ्याचा थाट ओसरतो ना तोच, या स्टोअरकडे व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक असलेला 'वैध अन्न परवाना' नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. विनापरवाना कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या स्टोअरला वैध अन्न परवाना' जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत व्यवसाय करू नये अशी नोटीस देण्यात आली असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी (कुडाळ-वेंगुर्ला) अभय चंदनशिवे यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान या नोटिशीमुळे आपला बाजार'ला शटर खाली करावी लागली आहेत.

चंदनशिवे म्हणाले, मिळालेल्या गोपनीय तक्रारीच्या आधारे माझे सहकारी करण गावीत आणि मी यांनी कुडाळ येथील या स्टोअमध्ये अचानक तपासणी केली. यावेळी उपस्थित असलेले स्टोअर मॅनेजर अमोल सुतार यांच्याकडे अन्न सुरक्षा विभागाचा कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या आस्थापनांना अन्न सुरक्षा कायद्यानुसार 'फूड लायसन्स' घेणे बंधनकारक असते, पण ते त्यांच्याकडे उपलब्ध झाले नाही.

गुळाचा नमुना जप्त; तपासणीसाठी लॅबला पाठविला!

या तपासणीदरम्यान दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या गुळाचा रंग आणि दर्जा संशयास्पद आढळल्याने, आम्ही त्याचे फॉमर्ल सॅम्पल्स जप्त केले असून ते तपासणीसाठी मुंबई बांद्रा येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. विनापरवाना व्यवसाय करणे हा अन्न सुरक्षा कायदा कलम ३१ नुसार गंभीर गुन्हा असून कलम ६३ नुसार तो शिक्षेस पात्र आहे. त्यानुसार या पेढीला तात्काळ 'व्यवसाय बंद'ची नोटीस बजावली असून, जोपर्यंत वैध परवाना प्राप्त होत नाही, तोपर्यंत या दुकानातून कोणत्याही प्रकारची विक्री करता येणार नाही. या बेकायदेशीर व्यवसायाप्रकरणी ठाणे येथील सक्षम प्राधिकरणाकडे दाखल करून दंडात्मक व कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे चंदनशिवे यांनी स्पष्ट केले.​

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news