Sindhudurg News| हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी स्पर्धा!

सौ. ममता वराडकर : मालवण येथे राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा शुभारंभ
Sindhudurg News
मालवण येथे राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा शुभारंभ
Published on: 
Updated on: 

मालवण : नाटक ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. संगीत नाटकापासून ते आजच्या प्रायोगिक व आधुनिक रंगभूमीचा प्रवास प्रेरणादायी असा आहे. मालवण ही कलेची भूमी असून राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मालवणात होत आहे, याचा अभिमान आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ही स्पर्धा करत आहे, असे प्रतिपादन मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची मालवण केंद्रावरील प्राथमिक फेरी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे होत आहे. या स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते झाले. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक संजय शिंदे, परीक्षक डॉ. विशाखा शिरवाडकर, डॉ. शशिकांत चौधरी, ज्येष्ठ रंगकर्मी नरेंद्र आंगणे, भजनसम्राट भालचंद्र केळूसकर, अ. भा. नाट्य परिषद मालवण शाखाध्यक्ष प्रकाश कुशे, समीक्षक विनायक कोळंबकर, प्रफुल्ल देसाई, शिवराज मंच मालवणचे भूषण साटम, शिवसेना तालुकाप्रमुख राजु बिडये आदी व इतर उपस्थित होते. संजय शिंदे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

सौ. वराडकर म्हणाल्या, रंगभूमी ही माणसाला जगण्याची कला शिकवते तसेच समाज प्रबोधन करून संस्कृतीचा ठेवा जपण्याचे मोठे काम करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात रंगभूमी टिकवून ठेवण्याचे आजचे हौशी कलाकार निष्ठेने करत आहेत. या स्पर्धेत सादर होणारी प्रत्येक कलाकृती नाट्य रसिकांच्या मानाचा ताबा घेईल. अक्षय सातार्डेकर यांनी आभार मानले

२९ पर्यंत सादर होणार १२ नाटके

स्पर्धेच्या उदघाटनंतर 'विकेटकीपर' हे नाटक सादर झाले. या स्पर्धेत २९ नोव्हेंबर पर्यंत विविध नाट्यसंस्थांची १२ नाटके सादर होणार आहेत. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात या नाट्यप्रयोगांचा आनंद नाट्यरसिकांना घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.