Sindhudurg News : मालवण समुद्रात दोन एलईडी नाैका ताब्यात

अवैध एलईडी मासेमारीविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाची कठोर भूमिका
Sindhudurg News
मालवण समुद्रात दोन एलईडी नाैका ताब्यात
Published on
Updated on

मालवण/ देवगड : मालवण समुद्रात गोवा व देवगड येथील एल. ई. डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई करत दोन नौका ताब्यात घेतल्या. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

मालवण समुद्रात संयुक्त गस्तीत एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त केल्यामुळे अवैध एलईडी मासेमारीविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाची कठोर भूमिका पुन्हा स्पष्ट झाली आहे. मागील आठवड्यातही मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने गोवा आणि रत्नागिरी येथील एलईडी नौकांवर कारवाई केली होती. सध्याच्या हंगामात ही एलईडी मासेमारीविरुद्धची दहावी मोठी यशस्वी कारवाई आहे. ८ एप्रिल रोजी रात्री मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला, देवगडचे परवाना अधिकारी कि. मा. वाघमारे, मालवणचे परवाना अधिकारी ग. शं. टेमकर हे मालवण समुद्रात नियमित गस्त घालत होते.

यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१ नों. क्र.- IND-MH-५-MM-६८५ व अक्राजे (Acranje) नों. क्र.- IND-GA-१-MM-३९६२ या महारा जलधी क्षेत्रात मालवण समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. मासेमारी करताना सापडून आल्या. या दोन्ही नौकांवर तांडेलसह एकूण अंदाजे ३५-४० खलाशी आहेत. सदर नौका जप्त करून देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवरील एलईडी लाईट सामग्री जप्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news