

कणकवली : लिंगायत समाज कणकवली तालुका यांच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १९ एप्रिल रोजी श्री प. पू. भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास येथे हा उत्सव भक्ती भावाने साजरा होणार आहे.
या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वा. सामूहिक शिवलिंग पूजा तसेच दुपारी १२ वा. अभिषेक व बसवेश्वर जन्म सोहळा पार पडणार आहे. शनिवारी सायंकाळी महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये ५४ हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. तर रात्रौ महिलांचा नृत्य आविष्कार व लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसहित युवा व तरुणांनी सहभाग घेत आपली वेगळी छाप उमटवली. या रंगतदार व बहारदार कार्यक्रमामुळे समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. १९ एप्रिल रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमानिमित्त तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्ि थत रहाण्याचे आवाहन लिंगायत समाज कणकवली तालुका यांनी केले आहे.