Sindhudurg Agri center - जिल्ह्यातील १२ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने रद्द तर ५ परवाने निलंबित

जिल्ह्यातील १२ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने रद्द तर ५ परवाने निलंबित
Sindhudurg Agri center
Sindhudurg Agri center
Published on
Updated on

ओरोस : खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात निविष्ठा विक्री केंद्रांच्या तपासणी मोहिमेमध्ये एकूण १९ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्या. अनियमितता आढळलेल्या १९ कृषी निविष्ठा विक्री केंद्रधारकांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या समक्ष झालेल्या सुनावणी दरम्यान ८ खत निविष्ठा विक्री केंद्र, २ बियाणे निविष्ठा विक्री केंद्र, २ किटकनाशके निविष्ठा विक्री केंद्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Sindhudurg Agri center
Ratnagiri BJP joining statement |कुंपणावर असलेलेही लवकरच भाजपमध्ये येतील!

तर इतर ४ खत विक्री परवाने व १ किटकनाशक विक्री परवाना निलंबित करण्यात आले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी सांगितले. तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटीबाबत खुलासा वेळेत सदर न करणे व सुनावणी दरम्यान उपस्थित न राहिल्याने खालील निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

यामध्ये क्षेत्रज्ञ अग्रो, चांदोशी ता. देवगड, सद्‌गुरू कृपा कृषि सेवा केंद्र ता. कणकवली, सृष्टी क्रॉप केअर, ता. सावंतवाडी, खरडे सेल्स कॉर्पोरेशन, मडूरा ता. सावंतवाडी, श्री तारादेवी कृषि सेवा केंद्र, केळूस ता. वेंगुर्ला, बल्लाळ कृषि सेवा केंद्र, दाणोली, ता. सावंतवाडी, झुवारी फार्म हब लि. तळेबाजार ता. देवगड, साईराज कृषि सेवा केंद्र तळकट (ता. दोडामार्ग) या किरकोळ खत विक्री केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Sindhudurg Agri center
Ratnagiri district per capita income target | जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषि निविष्ठांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोहीम स्वरुपात कारवाई केली आहे. खत विक्री केंद्रावर साठा फलक व किंमत सूची अद्ययावत असणे, खतांचा साठा व विक्री नोंदवही प्रत्यक्ष साठ्याशी जुळणे, लिंकिंगला नाही म्हणून बोर्ड विक्री केंद्रावर प्रदर्शित करणे, अनधिकृत व विनापरवाना खत विक्रीवर बंदी, जास्त युरिया खरेदी करणाऱ्यांची तपासणी करणे व इ पॉस मशीन व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसा खत व बियाणे साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावी, खरेदीचे पक्के बिल घ्यावे तसेच बिलावर लॉट नंबर आणि किंमत तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news