एकजुटीने धरण पूर्ण करूया : खा. अरविंद सावंत

कुंभवडे ग्रामस्थ व धरण जमीनधारकांची मुंबईत बैठक
Sindhudurg News
खा. अरविंद सावंत
Published on
Updated on

कणकवली : कुंभवडे धरण हे माझे एकट्याचे स्वप्न न राहता ते प्रत्येक कुंभवडे वासियांचे स्वप्न म्हणून सगळ्यांनी एकजुटीने पूर्ण करूया. हे धरण आपल्या पुढील पिढ्यांना वरदान ठरणार आहे. या धरणामुळे आपलाच नाही तर गड नदीपर्यंत अनेक गावांचा पिण्याचे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कित्येक हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्याचा फायदा गावाला अनेक मार्गानी होणार आहे. म्हणून कोणाच्याही खोट्या माहिती वर विश्वास ठेवू नका. लागेल ती मदत करायला मी नेहमीच तयार आहे. कोणाचेही काडीमात्र नुकसान होऊ देणार नाही, असा विश्वास खा.अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.

लघु पाटबंधारे प्रकल्प कुंभवडे संदर्भात सध्याची परिस्थिती समजून घेणे त्यासंदर्भात आवश्यक ती माहिती देणे आणि संबंधित जमीनधारकांना तातडीने जमिनीचा, झाडांचा मोबदला मिळण्यासाठी पुढील रूपरेषा ठरविणे आणि तातडीने मोबदला वाटप सुरू करावे अशी मागणी करण्यासाठी संबंधितांची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित कुंभवडे ग्रामस्थ आणि धरण जमीनधारक यांना खा.अरविंद सावंत यांनी मार्गदर्शन केले. सन 1994-95 मध्ये आपण आमदार असल्यापासून कुंभवडे गावासाठी कशी विकास कामे केली याची आठवण खा.सावंत यांनी करून दिली. आपले गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे, माझे गाव मला खूप आवडते, आपले गाव सुजलाम् सुफलाम् झाले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन खा.सावंत यांनी केले.

कुंभवडे ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण सावंत यांनी प्रास्ताविक करतांना प्रकल्पासंदर्भात तसेच गावात सध्या सुरू असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था सचिव शशिकांत सावंत , कुंभवडे ग्रामस्थ संघ मुंबइ अध्यक्ष प्रमोद कृपाळ, सचिव विजय सावंत, पुंडलिक सावंत, शरद सावंत, चंद्रकांत सावंत, अजित सदडेकर, कुंभवडे ग्रामविकास संस्थेचे खजिनदार आकाश तावडे, उपाध्यक्ष शिरीष सावंत, उदय सावंत, सुनील सावंत, गंगाराम परब, सुनील कदम आणि इतर ग्रामस्थ,धरण जमीनधारक उपस्थित होते. बैठकीबद्दल उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले. बैठकीचे आयोजन कुंभवडे ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण(भाई) सावंत यांनी केले होते.त्याला कुंभवडे ग्रामस्थ संघाचे सचिव विजय श्रीधर सावंत यांचे सहकार्य लाभले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news