Mumbai Goa Highway : वेरळ घाटात दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्‍प

file photo
file photo
Published on
Updated on

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात चौपदरीकरणासाठी तोडलेल्या डोंगराची दरड पावसामुळे महामार्गावर काेसळल्याने घाटात महामार्गाची एक मार्गिका बंद हाेऊन वाहतूक ठप्‍प झाली होती. ही घटना गुरुवारी सकाळी ११.४५ च्या दरम्यान घडली.

महामार्ग विभागाने ही दरड बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. लांजा तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून या पावसाच्या पाण्यामुळे महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या डोंगराची माती रस्त्यावर आली. वेरळ घाटात महामार्ग चौपदरीकरण कामासाठी बाजूचे डोंगर तोडून माती वापरण्यात आली आहे. त्यामुळे बाजूच्‍या डोंगरांवरून पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाहत असतो.

गेले तीन दिवस पावसाचे प्रमाण वाढल्याने चौपदरीकरणाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर माती पाण्याबरोबर महामार्गावर वाहून आली. त्यामुळे गुरुवारी सकाळी तासभर वेरळ ते देवधे दरम्यान महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. महामार्ग विभागाने जेसीबीच्या सहाय्याने महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news