Kunkeshwar Mahashivratri Yatra : श्रीक्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सव 15 ते 17 फेब्रुवारी रोजी

तीन दिवस होणार शिवशंभोचा जागर; 17 फेब्रुवारी रोजी दर्श अमावस्या महापर्वणी योग
Kunkeshwar Mahashivratri Yatra
कुणकेश्वर मंदिर
Published on
Updated on

देवगड ः दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध श्रीक्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सव 15 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टकडून सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू असून, भाविकांच्या सुरक्षिततेसह सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यात्रा काळात भव्य मंडप उभारणी, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी रस्त्यांची सोय, मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग व मजबूत रेलिंग करण्यात आले आहे. तसेच, स्वतंत्र स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान होणाऱ्या चोऱ्या, महिलांची छेडछाड यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी मंदिर व परिसरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, त्यात जम्बो कॅमेऱ्यांचाही समावेश आहे. देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक, तसेच समुद्रकिनारी सागरी सुरक्षा दल तैनात असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news