कुडाळ- नाबरवाडी येथे बंद फ्लॅट दिवसाढवळ्या फोडला

Burglary Case: रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास
Kudal Nabarwadi Theft
कुडाळ : याच कपाटातील रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. (छाया : राजाराम परब )
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ - नाबरवाडी येथील कॉम्प्लेक्स मधील उदय वासुदेव आईर यांचा बंद फ्लॅट फोडून आतील 15 हजार रुपये रोख रक्कम व सोन्या - चांदीचे दागिने मिळून एकूण 70 हजार 160 रू. चा ऐवज चोरीस गेला. ही चोरी दिवसा ढवळ्या घडली असून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांच्यामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला.

उदय आईर यांची पत्नी व मुलगा 20 फेब्रुवारी रोजी मालवण येथ गेले होती. 21 रोजी त्यांची पुतणी स. 8.30 वा सावंतवाडी येथे गेली होती. तसेच उदय आईर हे स.10.30 वा चे दरम्याने आपल्या व्यवसायासाठी गवळदेव कुडाळ येथे गेले होते. दुपारी 2.30 वा. ते गोवा- पणजी येथे गेले. सायं. 7.30 वा. त्यांच्या पुतणीने मोबाईल फोन करून घराचा दरवाजा उघडा दिसल्याने विचारले. त्यांनी आपण दरवाज्याला लॉक करून आलो असल्याचे सांगितले. यानंतर तिने घरात जावुन पाहिल्यावर दरवाज्याची कडी कोयंडा तोडलेला आढळला व. आतील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते. कपाट उघडी होते . यानंतर पणजीवरून कुडाळ येथे रात्री घरी आल्यावर चोरीला गेलेल्या सामानाची खात्री केली. तेव्हा घरात असलेले कपाट मधील सोन्याचा काँईन, कर्णफुले, सोन्याची चैन पेंडंट सहित, चांदिचे ब्रेसलेट, व दोन चांदिच्या अंगठ्या व 15 हजार रोखरक्कम असे चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.

यामध्ये 6 हजार 750 रू.किंमतीचा एक 5 ग्रॅम वजनाचा बँकेकडुन खरेदि केलेला सोन्याचा कॉईन ,17 हजार 535 रू किंमतीचे व 2 ग्रॅम 660 वजनाचे एक कर्णफुल जोड,25 हजार 875 रू किमतीची व 7.14 ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन पेंडंट, 5 हजार रुपये किंमतीचे एक चांदिचे ब्रेसलेट व दोन चांदिच्या अंगठ्या , 15 हजार रोखरक्कम असा मुद्देमाल चोरीस गेला . चोरट्याने रुमचा समोरील दरवाजा कडी कोयंडा हत्याराने उटकटुन काढले . लँच धारधार हत्याराने तोडुन आतमध्ये प्रवेश केला . तसेच घरात असलेल्या कपाटाचे लॉकरचे लॉक उचकटुन काढुन त्यात लॉकरमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेले.कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्‍हाडकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने, हवालदार हरेश पाटील व होमगार्ड पांडुरंग कदम घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करून चोरट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची फिर्याद उदय आहीर यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे.

दिवसाढवळ्या चोर्‍यात वाढ आरोपी मोकट

कुडाळ शहर परिसरात तसेच तालुक्यात दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी होणार्‍या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. पिंगुळी येथील श्री राऊळ महाराज मठ, माणगाव, नेरूर येथेही गेल्या काही महिन्यात घरफोड्या झाल्या आहेत. मात्र या चोरट्यांचा अध्यापही सुगावा लागलेला नाही. या सर्व चोर्‍यांमधील चोरटे हे सराईत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news