Konkan Railway | कोकणातील प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेची विशेष सोय

Udhna-Mangalore Train | उधना-मंगळुरू द्विसाफ्ताहिक गाडीच्या फेर्‍यांमध्ये वाढ
 Konkan Railway
Udhna-Mangalore Train special Western Railway(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : पश्चिम रेल्वेने कोकणात जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी उधना आणि मंगळूरू दरम्यान धावणार्‍या 09057/09058 या विशेष गाडीच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आता 2 जुलै ते 28 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. गाडी क्रमांक 09057 उधना-मंगळूरू ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी 2 जुलै पासून 28 सप्टेंबर पर्यंत दर बुधवार आणि रविवारी रात्री 8 वा. उधना जंक्शनहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 7.45 वा. मंगळूरू जंक्शनला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 09058 मंगळूरू-उधना ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी 3 जुलै पासून 29 सप्टेंबरपर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी रात्री 10.10 वा. मंगळुरु जंक्शनहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 11.05 वा. उधना जंक्शन येथे पोहोचेल.

 Konkan Railway
Sawantwadi News | सातार्डा-न्हयबाग मार्गावरील पूल कोसळण्याची भीती

ही गाडी राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकावर थांबणार आहे.या दोन्ही गाड्यांच्या थांब्यांचे आणि वेळापत्रकाचे तपशील उपलब्ध झाले आहेत.

 Konkan Railway
Sawantwadi News | सातार्डा-न्हयबाग मार्गावरील पूल कोसळण्याची भीती

गाडी क्रमांक 09057 उधना-मंगळूरू या विशेष गाडीसाठीचे आरक्षण 29 जून पासून सुरू झाले आहे. त्यामुळे कोकणात प्रवास करू इच्छिणार्‍या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news