Anganewadi Yatra Special Train : आंगणेवाडी यात्रेनिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या

7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान मडगाव ते एलटीटी दरम्यान धावणार
Konkan Railway
Konkan Railway Pudhari Photo
Published on
Updated on

ओरोस ः आंगणेवाडी यात्रेनिमित्त कोकण रेल्वे प्रशासनाने 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवी भराडीच्या दर्शनासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची सोय होणार आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेसाठी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी क्र. 01004 मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक दरम्यान 7 व 9 फेब्रुवारी रोजी धावणार आहे. ही गाडी मडगाव येथून दुपारी 16.30 वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05:50 वा. मुंबईला पोहोचेल. गाडी क्र. 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव जंक्शन ही गाडी 8 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी रोजी धावणार आहे.सदर गाडी मुंबई येथून स.07:55 वा. सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वा.मडगावला पोहोचेल.या गाड्यांना एकूण 22 डबे असून त्यातील 20 स्लीपर कोच आणि 2 एसएलआर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news