Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक अजूनही विस्कळीत

बहुतांश एक्‍स्‍प्रेस गाड्या ६ ते ७ तास विलंबाने
Konkan Railway
Konkan Railway pudhari photo
Published on
Updated on

मळगाव : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेले आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील बऱ्याच गाड्या ६ ते ७ तास विलंबाने धावत आहेत. दिवा-सावंतवाडी व सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा सहा तासाने सावंतवाडी स्टेशनला विलंबाने दाखल झाली. यामुळे प्रवाशी संतप्‍त झाले आहेत.

मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, एलटीटी मडगाव एक्‍स्‍प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांना पुनर्नियोजित वेळेनंतर सुमारे सहा ते सात तास उशीर झाल्याने जनशताब्दी, तुतारी, मांडवी आणि कोकणकन्या या गाड्या सातत्याने उशिराने धावत आहेत. मंगळवारी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने सावंतवाडी येथे पोहोचली. तर, एलटीटी-मडगाव गाडी सुमारे तीन तास उशिराने धावत होती. मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस सुमारे सव्वा तास उशिराने धावत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news