Konkan Railway : सीएसटीएम-सावंतवाडी एक्स्प्रेसला मंजुरी

आजपासून दररोज धावणार; गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा
Konkan Railway
सीएसटीएम-सावंतवाडी एक्स्प्रेसला मंजुरी
Published on
Updated on

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्स्प्रेस ट्रेन सेवा सुरू होणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. खा. श्रीकांत शिंदे आणि खा. नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोकण रेल्वे मार्गावर या नव्या दैनिक एक्स्प्रेस सेवेला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले.

ही सेवा गुरुवार ३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्‌घाटन प्रसंगी दुपारी १२.२० वा. हिरवा झेंडा दाखविण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. खा. नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने ठाणे येथे कोकणवासीयांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वे सेवेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

या एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पर्यटन, शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सोयीचा रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. सुमारे ५१० किलोमीटरचा थेट आणि सोयीस्कर रेल्वे संपर्क या सेवेमुळे उपलब्ध होणार असून, कोकणच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी ही रेल्वेसेवा विशेष महत्त्वाची ठरणार असून, मुंबई-ठाणे परिसरातील चाकरमानी तसेच कोकणातील नागरिकांना प्रवासाची मोठी सोय होणार आहे.

...या स्थानकांवर देण्यात आले थांबे!

भारतीय रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्ध माहितीनुसार गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड व गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news