

सावंतवाडी: प्रवाशांना जलद इंटरनेट आणि आधुनिक डिजिटल मनोरंजन सेवा देण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने एक मोठे पाऊल उचलले आहे. केआरसीएल आणि ब्ल्यू क्लाऊड सॉफ्टेक सोल्युशन्स लिमिटेड यांच्यात 18 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई येथे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार, कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 5 जी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रवाशांना जलद इंटरनेट सेवा, वास्तविक वेळेतील माहिती आणि उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करणे आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आधुनिक होण्याची अपेक्षा आहे. याबाबत माहिती देताना केआरसीएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा म्हणाले, ब्ल्यू क्लाऊड सॉफ्टेक सोल्युशन्ससोबतची भागीदारी
कोकण रेल्वेच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. 5 जी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन प्रणालींच्या माध्यमातून कोकण रेल्वेला आधुनिक करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत. या सहकार्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक समृद्ध होईल आणि भारतीय रेल्वे क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला जाईल.
दोन्ही संस्था तांत्रिक आणि कार्यप्रणालीची क्षमता तपासतील. मॉडेल यशस्वी ठरल्यास, या अत्याधुनिक सुविधांचा विस्तार कोकण रेल्वेच्या इतर स्थानकांवरही केला जाईल. हा प्रकल्प दीर्घकालीन महसूल-वाटप पद्धतीवर व्यावसायिक स्वरूपात राबवला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात या तीन स्टेशनवर सेवा
या महत्त्वाकांक्षी संयुक्त प्रकल्पाची सुरुवात सुरुवातीला प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तत्त्वावर मडगाव जंक्शन, रत्नागिरी, उडुपी या तीन महत्त्वाच्या स्थानकांवर केली जाईल.ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स, ही 5 जी तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी कंपनी, स्थानक परिसर आणि रेल्वे डब्यांमध्ये (5ॠ ऋळुशव थळीशश्रशीी अललशीी (ऋथअ) सेवा पुरवणार आहे. यासोबतच, इन-स्टेशन आणि इन-ट्रेन प्रवाशांसाठी डिजिटल मनोरंजन प्रणाली देखील उपलब्ध होईल.