

ओरोस : गणेशोत्सव तोंडावर आला आहे, सिंधुदुर्गात दळणवळणाचे प्रमुख साधन एसटी वाहतुकीचे आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी जवळपास पाच हजार एसटी फेर्या होणार आहेत. त्यामधून येणार्या गणेशभक्त, प्रवाशांना चांगली सेवा द्या. जिल्ह्यातील कोणत्याही शालेय व अन्य प्रवासी फेर्या रद्द होणार नाही याची दक्षता घ्या, असे आदेश पालकमंत्री नीतेश राणे यांनी एसटी वाहतूक नियोजन बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग बॅक अध्यक्ष मनीष दळवी, एसटी विभाग नियंत्रण प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय वाहतूक अधीक्षक नीलेश लाड अन्य तालुका वाहक नियंत्रण उपस्थित होते.
जिल्ह्यात मिनी बसचा प्रभावी वापर करा. व या मिनी बसचा ग्रामीण व शहरी भागातील जनतेला चांगला वापर होईल असे नियोजन करा, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी एसटीच्या अधिकार्यांना केल्या.